मोहगाव येथील शिवम कृषी केंद्र या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील शेतीसंबंधी खत, बी-बियाणे, औषधे व इतर कृषी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागण्यामागे संशयास्पद कारणे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे नसून वैरभावनेतून आग लावण्यात आली असावी, असा संशय दुकानमालक जयेश गायधने यांनी व्यक्त केला आहे.