अवैधरित्या चालत असलेल्या कतलखान्यावर छापा घालून पोलिसांनी गोमांस पकडले होते व गोवंशांना जीवदान. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासोबतच शहरात सुरु असलेल्या या अवैध कतलखान्यावर कारवाई करण्याच्या मागणीला घेत शहरातील श्रीराम गजानन मंदिर परिसरात हनुमान चालीसा पठण करून निषेध नोंदवण्यात आला व त्यानंतर गजानन मंदिरापासून हनुमान चालीसाचे पठन करत नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढून मुख्याधिकारी नगर परिषद तिरोडा यांना निवेदन देवून कत्तल खाना जमीनदोस्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.