उदगीर: उदगीर व जळकोट तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा,छावाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील यांची मागणी
Udgir, Latur | Sep 30, 2025 जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे राहील असे वाटत नाही, उदगीर-जळकोट तालुक्यात झालेल्या नैसर्गिक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी छावाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील यांनी केली आहे,उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी दत्ता पाटील यांनी केली आहे,