संगमनेर: संगमनेर शहरातील रस्त्यांना नवी झळाळी — ५ कोटींचा निधी मंजूर
संगमनेर शहरातील रस्त्यांना नवी झळाळी — ५ कोटींचा निधी मंजूर अहिल्यानगर – संगमनेरकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तब्बल ५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील २१ रस्त्यांच्या विकास कामांसाठी हा निधी उपलब्ध होणार आहे. नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी हा निधी मिळवून दिला आहे.