वाशिम: सोयाबीनला कमी दर दिल्याने कारंजा येथील शेतकर्यांचा संताप अनावर, हर्राशी पाडली बंद
Washim, Washim | Oct 28, 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे व्यापार्यांनी शेतकर्यांचे सोयाबीन 3300 रुपये प्रतिक्विंटल या दराने मागितल्यानंतर शेतकर्यांनी संताप व्यक्त करुन सोयाबीनची हर्राशी बंद पाडल्याची घटना दि. 28 ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईस आला असून त्यातच सोयाबीनला सरासरी 3300 रुपये एवढा निच्चांकी दर दिल्या जात आहे. जो शासकीय हमीभावापेक्षा तब्बल 1 हजार रुपयांनी कमी आहे.