नागपूर ग्रामीण: ऑइल मिलर्स च्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
विकसीत महाराष्ट्रासाठी ऑईल मिलर्स असोसिएशनने दिलेले योगदान मोलाचे आहे. अलीकडच्या काळात भारताने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली असून भारतीय पासपोर्टसाठी जगात ओढ निर्माण झाली आहे. ऑईल मिल असोसिएशनने विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. आपल्या समस्या व अडचणी राज्य शासन केंद्र शासनाकडे मांडण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.