चाळीसगाव: बडाळावडाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाबाजी लक्ष्मण सूर्यवंशी यांची निवड
चाळीसगाव:बडाळावडाळी: ग्रामपंचायत बडाळावडाळी येथे बाबाजी लक्ष्मण सूर्यवंशी यांची उपसरपंचपदी निवड झाल्यामुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. नवनिर्वाचित उपसरपंच बाबाजी सूर्यवंशी यांच्या निवडीनंतर सरपंच अनिल पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायतीमधील आणि गावातील प्रमुख सदस्यांनी बाबाजी सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.