श्रीगोंदा: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची आ. विक्रम पाचपुते यांनी केली पाहणी
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची आ. विक्रम पाचपुते यांनी केली पाहणी शेतकऱ्यांना धिर देत, प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश श्रीगोंदा: श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी अतिवृष्टी मुळे बाधित भागांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी व नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांपासून सारोळा बद्दी, चिचोंडी पाटील आणि श्रीगोंदा-नगर मतदार संघात सुरू असलेल्या मुसळ धार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.