अहेरी: अहेरी तालूक्यातील चिंचगुंडी येथे वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिकेचा नवनिर्मित इमारतीच्या लोकार्पण
अहेरी तालूक्यातील चिंचगुडी येथे जनजाति विकास समीती गडचिरोली यांचा वतीने संचालीत विर बाबूराव शेडमाके अभ्यासिकेचा नवनिर्मित भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दि.३० सप्टेबंर मंगळवार रोजी सांयकाळी ५ वाजता मान्यवरांचा उपस्थीत संपन्न झाला. सर्व सोई सूविधा यूक्त अभ्यासीका इमारतीचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्कप्रमुख श्री. सुनीलजी देशपांडे यांचा हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार डॉ मिलींद नरोटे आदि हजर होते.