मुलचेरा: मुसळधार पावसामुळे धानपिकांचे मोठे नुकसान,मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना फटका
मुलचेरा तालुक्यातील लगाम परिसरातील गावात मागील तिन चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लगाम,कांचनपूर, शांतीग्राम, दामपूर, चुटुगुंटा व तुमरगुंडा या गावांमधील शेतकऱ्यांचे धानपिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नूकसानीची आज दि.२७ सप्टेबंर शनिवार रोजी दूपारी २ ते ४ वाजेदरम्यान मूलचेरा महसूल विभागाचा चमूने पाहणी केली व शेतकर्यांचा व्यथा ऐकूण घेतले व नूकसानीचे पंचनामे करीत अहवाल शाशनाकडे पाठवत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.