नांदुरा: शहरातील प्रभाग नंबर ७ मधील समस्या तात्काळ सोडवा– अर्जुन वाकोडे
नांदुरा शहरातील प्रभाग नंबर ७ मधील भीम नगर, खैवाडी,अंबा नगर, शिवराज नगर, रामनगर,सोफी बाग या भागातील अनेक समस्या भेडसावत आहेत.यामधील सोफी बाग भागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन नादुरुस्त असल्याने पाण्याचा प्रश्न आहे,काही भागात काँक्रीटीकरण रस्ते नसल्याने नागरिकांना त्रास होतोय,तर अजूनसुद्धा भीमनगर,खैवाडी या भागात दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत कोणतेही विकासकामे करण्यात आलेले नाहीत.