राहुरी: गुहा येथे वेटरची गळफास घेऊन आत्महत्या
राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील हवेली परिसरातील उरुळी देवाची येथील मूळ रहिवासी असलेला गणेश शिवाजी आदमाने(वय-३४) हा गुहा येथील साई सुंदर हॉटेल येथे गेल्या काही दिवसांपासून वेटरचे काम करत होता.