वाळूज येथे केमिकल ड्रम चा स्पोर्ट, यात एक कामगार गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 28, 2025
आज दि 28 आक्टोंबर  सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर  वाळुज एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमधील सुप्रीम सिलिकॉन या कंपनीत  भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीतील केमिकल ड्रमचा स्फोट होऊन आग भडकली असून, यात एका कामगाराला गंभीर भाजल्या गेल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, घटनेची माहिती मिळताच वाळुज तसेच कांचनवाडी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन मध्यरात्रीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.