शहरातील आजमशाही पुरा येथील आंगनवाडीत धामणी प्रजातीचा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.आंगनवाडी शिक्षिका काळे मॅडम यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगराध्यक्ष आमेर पटेल यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच नगराध्यक्षांनी क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्राला घटनास्थळी बोलावले.सर्पमित्राने अत्यंत काळजीपूर्वक सापाला पकडून शीशीमध्ये सुरक्षितरित्या बंदिस्त केले.या वेळी आंगनवाडीतील लहान मुले व परिसरातील नागरिकांचा मोठा अनर्थ टळला.