खुलताबाद: खुलताबादचे राजकारण तापले; काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपच्या नवनाथ बारगळांची उपनगराध्यक्षपदी बाजी
खुलताबाद नगरपरिषदेत काँग्रेसच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने भाजपच्या नवनाथ पाटील बारगळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडीमुळे ‘घोडेबाजारी’च्या चर्चांना उधाण आले असून, काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.दरम्यान, भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर पक्षीय कारवाई करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल श्रीखंडे यांनी दिली आहे.