अमळनेर: अमळनेर येथील पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर येथील पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना केलेल्या कामाच्या बिलातून टक्केवारी हिस्स्यातील ४ हजारांची लाच स्विकारतांना जळगाव लाच लुचपत विभागाने बुधवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करत रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप दत्तात्रय पाटील असे उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे