अमळनेर: नाथवाडा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, रुग्णालयात नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
जळगाव शहरातील नाथवाडा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.