नेर: शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे स्मृती दिनानिमित्त शाहू महाराज यांच्या प्रतिमेला करण्यात आले अभिवादन
Ner, Yavatmal | May 6, 2025 आज दिनांक सहा मेला सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता च्या सुमारास नेर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अनिरुद्ध मुंदाने,अविनाश शेंडे सर, वासुदेव शेंडे सर,अरविंद पाटील, मिलिंद जामनकर ,गायकवाड सर यांच्यासह भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.