लातूर-नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने हजारो कोटींची तरतूद केली आहे. यानिधीचा वापर पूर्ण पारदर्शकतेने व्हावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान केली. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने पुढील संभाव्य संकटांचा विचार करून शहरे सुदृढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.मुंबई,पुणे,छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरांप्रमाणेच लातूर शहरालाही दर्जेदार सुविधा मिळाव्यात असे म्हणाले.