परांडा: चांदणी नदीला पुन्हा महापूर, दुकानांमध्ये घरामध्ये घुसले पाणी मोठे नुकसान #Jansamasya
बालाघाट डोंगर रांगांमध्ये सलग दोन-तीन दिवस पडलेल्या पावसामुळे चांदणी नदीला पुन्हा महापूर आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुकानात पाणी घुसले असून प्रचंड नुकसान झालेले आहे. या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बार्शीशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही शेतकरी बांधव करत आहेत. ही 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 चित्र आहे.