पवनी: पवनीत नवरात्री उत्सवाचा भव्य प्रारंभ : घटस्थापना व रक्तदान शिबिराचे आयोजन ; आमदार भोंडेकर यांची उपस्थिती
Pauni, Bhandara | Sep 22, 2025 शारदीय नवरात्रीच्या प्रारंभानिमित्त पवनी शहरात धार्मिक व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी येथील प्रसिद्ध श्री चंडिका माता मंदिरात 22 सप्टेंबर रोजी सकाळी विधीपूर्वक घटस्थापना करून नवरात्री उत्सवाची सुरुवात करण्यात आली. मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. पूजा, अर्चा व आरतीने परिसर भक्तिमय झाला.धार्मिक उत्सवाबरोबरच समाजकारणाची जपणूक करण्याच्या उद्देशाने मंदिर प्रांगणात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.