हिंगोली: नगर परिषद उद्यान येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हिंगोलीत ५० मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण
हिंगोली येथे १७ सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजता दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मराठा समाजातील ५० बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याने संबंधित लाभार्थींना ओबीसी प्रवर्गातील शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.