अंबड: अंबड पोलीस ठाण्यातर्फे रन फॉर युनिटी कार्यक्रम उत्साहात संपन्न...
Ambad, Jalna | Oct 31, 2025 अंबड पोलीस ठाण्यातर्फे ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न*  अंबड (ता. 31 ऑक्टोबर) – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता अंबड पोलीस ठाण्याच्यावतीने “रन फॉर युनिटी” या एकात्मता धाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या धाव स्पर्धेला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अंबड येथून झाली असून कार्यक्रमाचा समारोप पॉलीटेक्निक कॉलेज अंबड येथे करण्यात आला.