करवीर: महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा - आमदार राजेश क्षीरसागर
महायुतीला संधी द्या.शहरातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही . शिवसेनेला न्याय देण्यासाठी एकजुटीने कामाला लागा. कोल्हापूर उत्तर मधील ३० जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील असून दिलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे रहा आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज व्हा अशा सूचना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज दिल्या आहेत.