मेहकर: मेहकर शहरातील कुंटण खाण्यावर पोलिसांचा छापा दोन महिलांची सुटका अँटीसह सहकार्यास अटक
मेहकरसारख्या प्रसिद्ध आणि शांत शहरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान देहविक्रय करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, आण्टी आणि तिच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.मेहकर शहरातील एका भागात देहविक्री, अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांमधून समोर आली होती. परिसरातील सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या प्रकाराबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आल्यावर यांनी पथक तयार करून ही कारवाई केली.