तीन नोव्हेंबरला दशरथ झाडे हे त्यांची पत्नी कविता यांच्यासोबत पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील जबलपूर हायवे ने जात असताना एका ट्रक ट्रेलर ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडकली. या धडकेत कविताच्या हाताला मार लागला तर त्यांचे पती दशरथ यांच्या अंगावरून ट्रकचा चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कविता झाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.