नंदुरबार: आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव गावित यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते एस ए मिशन हायस्कूल प्रांगणात सत्कार
नंदुरबार शहरातील एस ए मिशन हायस्कूल प्रांगणात आज दुपारी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणव गावित यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे क्रीडा अधिकारी ओंकार जाधव यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.