दक्षिण सोलापूर: सीना नदीला पूर; नंदुर–वांगी मार्ग पुन्हा बंद...
सीना नदीची पाणीपातळी वाढल्याने नंदुर–वांगी मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नदीला पूर आला असून नंदुर येथील बांधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने मंगळवारी खबरदारीचा उपाय म्हणून मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीतील वाढलेला प्रवाह लक्षात घेता ग्रामस्थांना अनावश्यकपणे नदीकाठावर न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.