श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पुलाच्या अभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; संतप्त ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेला इशारा!
पुलाच्या अभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; संतप्त ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेला इशारा! श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव परिसरातील वंजारवाडी, गोरे मळा, थोरात मळा, कारंडे मळा, लवटे मळा आणि सरकवाडी येथील नागरिकांचा रोजचा प्रवास जीवावर उदार होऊन चालला आहे. या वस्त्यांवरील दोन हजार लोकसंख्येतून सुमारे ३०० विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी गावात जातात. मात्र, पुलाच्या अभावी त्यांना जांभुर्णाला ओढा पार करत शाळेत जावं लागतं.