पारनेर: धान्य वायू गळतीमुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू.. आई अत्यावस्थेत...
पारनेर तालुक्यातील ढोकी गावच्या धरमवस्तीवर धान्य पावडरच्या वायू गळतीने दोन मुले दगावली आहेत तर आई नगर येथे खासगी रुग्णालयात ट अत्यावस्थेमधे आहे. संतप्त नातेवाईकांनी टाकळी येथील कृषी केंद्रासमोर ठीय्या आंदोलन केलं आहे. सदर घटनेमधे हर्षद धरम व नैतिक धरम या चिमुकल्यांचा बळी गेला आहे तर आई सोनाली रुग्णालयात दाखल आहेत. सदर घटनेने परिसरामधे शोककळा पसरली आहे.