सातपूर औद्योगिक वसाहतीत एका पॉलीमर कंपनीस बुधवारी रात्री भीषण आग लागली. यामध्ये कंपनीचे लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. सातपूर विभागातील अग्निशामन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समजले.