राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे मजूर कामावर येण्यास नकार देत असून, शेतीची कामे ठप्प होत आहेत. परिस्थिती गंभीर झाल्याने काही शेतकरी थेट बंदूक हातात घेऊन शेतात पहारा देताना दिसत आहेत. खुडसरगाव येथील शेतकरी सतीश पवार हे बंदूक घेऊन शेतात उभे असल्याचे दृश्य परिसरात चर्चेचा विषय बनला असून बिबट्याचा उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी सतीश पवार यांनी केली आहे.