देवानंद हरिभाऊ सोळंके वय ६३ वर्ष राहणार बँक कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व आरोपी पित्रा,पुत्र असून एकाच घरात राहतात आरोपी राहुल सोळंके यांच्या पत्नीचा मोबाईल वर फोन आला असता बहिणीला त्याने उचलण्यासाठी सांगितले बहीण प्रांजली हिने उचलला नाही त्यामुळे आरोपीने बहिणीला शिवीगाळ केली फिर्यादीने हटकले या क्षुल्लक कारणावरून फिर्यादीला थापडा,बुक्क्या,लोखंडी पाईपने मारहाण केली त्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्याच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.