सिंदखेड राजा: नसराबाद फाट्याजवळील हॉटेल जगदंब समोर उभ्या ट्रकला स्कुटीची धडक वडील ठार, मुलगा गंभीर जखमी
जालन्यावरून सिंदखेड राजा शहराकडे येत असलेल्या एका स्कुटीने नसराबाद फाट्याजवळील हॉटेल जगदंब समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शहरातील एका डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.डॉ. प्रकाश किसन चौधरी असे मृतक डॉक्टरांचे नाव असून मुलगा अनमोल चौधरी हा गंभीर जखमी झाला आहे.