कन्नड: शहरातील बारामती अॅग्रो कारखान्यात ट्रान्सफॉर्मरला आग; अग्निशमन दलाची तत्पर कारवाई, जिवित हानी नाही
कन्नड येथील महात्मा फुले नगर परिसरातील बारामती अॅग्रो कारखान्यात आज (दि. 27 ऑक्टोबर) सकाळी सुमारे 12 वाजता ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच कांचनवाडी अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम यांच्या नेतृत्वात पार पडली