गोंदिया: पक्ष मजबुतीकरिता महिलांचा सक्रिय सहभाग वाढवा - सौ.रुपाली चाकणकर,जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक जलाराम लॉन, आमगाव रोड गोंदिया येथे प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, जिल्हाध्यक्षा सौ.राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी महिला संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महिला संघटनेचे आगामी वाटचाली बाबत भाष्य केले.