भंडारा: भंडारा जिल्ह्यात वातावरण बदलामुळे रुग्णसंख्येत वाढ ; जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी
भंडारा जिल्ह्यातील वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा हंगामी आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ थंडावा तर दुपारी उकाडा अशी वातावरणातील तफावत जाणवत असल्याने लहान मुले, वृद्ध तसेच दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण जास्त प्रमाणात बाधित होत आहेत.