देसाईगंज वडसा: विसोरा परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ आहे. अधूनमधून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असल्याने भीती पसरली आहे.मागील आठवड्यात बिबट्याने परिसरातील एका पशुपालकाच्या घरी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून गोठ्यातील शेळीला ठार केले. शेळीच्या ओरडण्याच्या आवाजावरून पशुपालक जागा झाला. त्याने बिबट्याला पाहून आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली.