नवापूर ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी पर्यटन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ‘ना हरकत दाखल्या’च्या बदल्यात तब्बल वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली असून, प्रशासनातील लाचखोरी पुन्हा एकदा उघड्यावर आली आहे.