हिंगणा: बीड गाव तरवडी खुर्द येथे निवडणूक निरीक्षकांनी घेतला मतदान केंद्रांचा आढावा
Hingna, Nagpur | Nov 21, 2025 हिंगणा : नगरपंचायत बिडगाव तरोडी खुर्द पांढुर्णा येथे होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक व चंद्रपूर अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी भेट देऊन पाहणी केली. निरीक्षक व्यवहारे यांनी नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रे तसेच स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष पाहणी केली.निरीक्षणादरम्यान त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रातील उपलब्ध यंत्रणा, सुरक्षाव्यवस्था, मूलभूत सुविधांची तपासणी केली.