गोंदिया: जिल्ह्यातील बोगस रेशनकार्ड होणार आता रद्द
Gondiya, Gondia | Sep 18, 2025 गरिबांचे पोट भरता यावे यासाठी शासनाकडून रेशन वाटप केले जात आहे. मात्र, याचा लाभ सधन व बोगस व्यक्तींकडूनही घेतला जात असल्याचे शासनाच्या नजरेत आले आहे. अशात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 'मिशन सुधार वर्क' ही मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यात अशा १३ हजार ६६५ रेशनकार्डची छाननी केली जाणार असून यातील बोगस रेशनकार्ड थेट रद्द केले जाणार आहेत.जिल्ह्यातील १३ हजार ६६५ रेशनकार्डची पडताळणी केली जाणार असून बोगस रेशन कार्ड रद्द होतील