यवतमाळ: केंद्र स्तरीय महादिप परीक्षेला प्रचंड प्रतिसाद ; जिल्हयातील १९५०४ विद्यार्थ्यांनी दिली केंद्र स्तरीय महादिप परीक्षा
यवतमाळ जिल्हा परिषद अधिनस्त जिल्हा परिषदेच्या १८२ केंद्र शाळेवर दिं.९ ऑक्टोबरला २०२५ ला केंद्र स्तरीय महादिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील ५वी ते ८वी च्या तब्बल १९५०४ विद्यार्थ्यांनी ही महादिप परीक्षा दिली. जिल्ह्यातील यामध्ये मराठी व उर्दु माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.