मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास बोटणीपासून काही अंतरावर घडली. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.