नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 1 ते 3 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत उदापूर येथे काल दि 28 नोव्हेंबर ला सायंकाळी 6 वाजता 5 लाख 16 हजार 280 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे गणेश पाटील व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.