पुणे नाशिक महामार्गावर चाकण मधील कोहिनूर सेंटर परिसरात बेवारस 60ते 65वर्षीय वयाचा इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला चाकण पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर इसमाला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं दरम्यान सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही.