अकोला: राजूरला जादूटोणा करून गुप्तधन काढणाऱ्या ६ इसमांविरोधात गुन्हा दाखल...
अकोले तालुक्यातील राजूर शहरातील भर वस्तीत एका जुन्या पडक्या इमारतीत मोकळ्या जागेत सोन्याची पेटी व गुप्तधन काढण्यासाठी जडीबुटीचा वापर करून जादूटोणा करणाऱ्या गिरीश बोऱ्हाडे याच्यासह सहा जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र राजूर पोलिसांनी इतर सहभागी नागरिकांवर कारवाई न केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलंय.