कोपरगाव: शहरातील येवला रोड येथे सामाजिक कार्यकर्त्यांचे डिव्हायडयरप्रश्नी अनोखे आंदोलन
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील येवला नाका परिसरात रस्त्याच्या मध्यभागी नव्याने बनविण्यात आलेल्या डिव्हायडरच्या सुरुवातीला रिफ्लेक्टर न बसवल्यामुळे वाहनचालकांना अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश अपुरा असल्याने आणि रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांना डिव्हायडर दिसत नाही. परिणामी, अनेकदा वाहनं थेट त्या डिव्हायडरवर आदळत आहेत.या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी आंदोलन केले.