कुही: पंपहाऊस आंभोरा येथे सिंचन योजनेच्या वतीने मार्गदर्शन
Kuhi, Nagpur | Sep 16, 2025 ग्रामीण भागात असलेल्या पंपहाऊस आंभोरा येथे 16 सप्टेंबर मंगळवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास आंभोरा उपसा सिंचन योजनाच्या वतीने टप्पा क्रमांक 1 मधील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंभोरा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता गोडे होते. प्रमुख अतिथी मंडळ अधिकारी मंगेश भुसारी, गोंडवाना विद्यापीठाचे मिलिंद जोशी, सहाय्यक अभियंता सिध्दांत वाहने, अनमोल अमृतकर,संमित हेमने आदी मान्यवर उपस्थित होते.