बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या पोलीस वसाहतमधून अज्ञात चोरट्याने दुचकी क्र. एमएच-२८-बीएफ-७४२४ क्रमांकाची होन्डा सीबी शाईन किंमत ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली आहे.याप्रकरणी अजिंक्य खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.