शहादा: दोंडाईचा येथील अमोल मराठे न्यायाधीश झाल्याने नंदुरबार येथील गोल्डन हेरिटेजमध्ये सत्कार
दोंडाईचा सारख्या छोट्याश्या शहरात प्रथमच युवा न्यायाधिश अमोल मराठे यांनी दिवसरात्र मेहनत घेत.स्पर्धा परिक्षा द्वारे दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षा देत नुकतेच यश संपादन केल्याने त्यांचे नंदुरबार शहरातील गोल्डन हेरिटेज सिटीत पांडुरंग पोटे यांच्या निवासस्थानी दि.21 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.